सिद्ध पादुकांचे आगमन; २२ नोव्हेंबर रोजी भव्य पादुका दर्शन सोहळा; जय्यत तयारी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन सिद्ध पादुकांचे २२ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या पादुका दर्शन सोहळ्या निमित्त सिल्लोड येथे आगमन झाले आहे. कार्यक्रमाच्या प्रित्यर्थ कार्यक्रम स्थळी जय्यत तयारी सुरु असुन भाविकांमधे उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांच्या दर्शनाचा पवित्र लाभ सर्व भाविकांना मिळणार असून, या निमित्ताने सिल्लोड तालुक्यासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी होणाऱ्या पादुका व दर्शन सोहळा प्रित्यर्थ विविध कार्यक्रम होणार असुन या मधे महासंतसंग, पादुकांची भव्य शोभा यात्रा, सामाजिक उपक्रम, गुरुपुजन, सिध्द पादुका दर्शन, प्रवचन, उपासक व बाल उपासक दिक्षा, प्रवचन, पुष्पवृष्टी तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

भव्य दिव्य सोहळ्यासाठी सिध्देश्वर वस्त्रोद्योग संस्था (सुतगिरणी मैदान) भराडी रोड येथे भाविकांसाठी भव्य मंडप, संतपीठ, आसन व्यवस्था, महाप्रसाद, पिण्याचे पाणी, तसेच पार्किंग अशा विविध सेवांचे नियोजन करण्यात आले आहे.
रामानंद संप्रदाय, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सेवा समितीच्या वतीने सिल्लोड तालुक्यातील तसेच संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व गुरुबंधू, गुरुभगिनी, भाविक व भक्तांनी रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सिद्ध पादुकांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

सिद्ध पादुकांचे दर्शन घेऊन जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याची ही पवित्र संधी असून, सर्व भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.